महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांना भावपूर्ण श्रद्धांजली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 28, 2025

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

दि.२९ अमरावती :- सुप्रसिद्ध कवि, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे.

20 हून अधिक काव्यसंग्रह आणि 6000 वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुद्धा प्रचंड गाजले. कालौघात त्यांनी नवीन माध्यमाचाही तितक्याच सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यलेखनाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

 

-        मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages