जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 5, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ३१ ऑक्टोंबर रोजी अतिरीक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages