तीर्थक्षेत्र शिरजगाव कार्तिक स्वामी सभागृहात ५१ जोडप्यांचा गायत्री मंत्र यज्ञसंपन्न. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 5, 2025

तीर्थक्षेत्र शिरजगाव कार्तिक स्वामी सभागृहात ५१ जोडप्यांचा गायत्री मंत्र यज्ञसंपन्न.

शिरजगाव कसबा ,दिनांक ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क )

 


पवित्र तीर्थक्षेत्र कार्तिक स्वामी शिरजगाव कसबा येथे गायत्री समूह द्वारा ५१ जोडप्यांचा यज्ञ संपन्न झालेला आहे. 

हरिद्वार येथून आलेल्या अखंड दिव्य ज्योत रथाचे  शिरजगाव शांती लाँन येथून  भजन दिंडी द्वारा गावातील मुख्य रस्त्यावरून कार्तिक स्वामी मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर  संस्थानचे अध्यक्ष विनायक गुर्जर , सुखदेवराव अस्वार व संचालक मंडळांनी गायत्री रथाचे पूजन केले व त्यानंतर  गायत्री मंत्र द्वारा ५१ जोडप्यांचे हस्ते यज्ञ करण्यात आले आहे.

 अखंड दिव्य ज्योत गायत्रीरथा सोबत संत मनोहर पवार, महंत सुरेश आकोटकर, शंकर चिखलकर, ओंकार भांगे सोबत आहे. रथाचे व्यवस्थापन बारी समाजाचे माजी अध्यक्ष अरुण आकोटकर व सुभाष बोबडे यांनी केले आहे.

५१ जोडप्याचा यज्ञ संपन्न झाल्यानंतर संत महंताचा मनोहर सुने माजी जि. प. सभापती , प्रकाश गुर्जर संचालक जनता बँक व अरुण गणथडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अरुण आकोटकर यांचा डॉ. विजय दाभाडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यज्ञाचे व्यवस्थापन संजोग दुधे, साहेबराव अस्वार, लक्ष्मण सातपुते ,बबन बदुकले यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद कुऱ्हाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष बोबडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages