श्रीक्षेत्र बहीरम यात्रेसाठी प्रशासन सज्ज २० डिसेंबरपासून होणार प्रारंभ, ८ डिसेंबरला लिलाव चांदूरबाजार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

श्रीक्षेत्र बहीरम यात्रेसाठी प्रशासन सज्ज २० डिसेंबरपासून होणार प्रारंभ, ८ डिसेंबरला लिलाव चांदूरबाजार

 

बहीरम यात्रेसाठी जय्यत तयारी; ८ डिसेंबरपासून हर्रास

चांदूरबाजार, २७ नोव्हेंबर:
श्री क्षेत्र बहीरम (जिल्हा अमरावती) येथील प्रसिद्ध यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ग्रामपंचायत कारंजा बहीरम, पंचायत समिती चांदूर बाजार आणि जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही पारंपरिक यात्रा यावर्षी २० डिसेंबर ते ३० जानेवारी २०२५-२६ या कालावधीत भरणार आहे.
बहीरम यात्रेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून ५७ कि.मी. आणि चांदूर बाजारपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.  येथे बहीरम बाबा (भैरव) यांची पुरातन मूर्ती असून, सदर ग्रामदैवत स्थानिक नागरिकांचे कुलदैवत आहे.शेतकऱ्यांचा खरीप हंगाम झाल्यानंतर सुगीच्या दिवसांमध्ये ही यात्रा आयोजित करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.
यात्रेचे स्वरूप आणि दुकाने
काळानुरूप यात्रेचे स्वरूप बदलत असले तरी, पारंपारिक दुकानांच्या ओळी कायम आहेत. यामध्ये नारळ प्रसाद, पितळी व लोखंडी भांडे, कटलरी, हॉटेल्स, मिठाई, खेळणी, कापड, घोंगळ्या, लाकडी सामान, भाजीपाले, झुले इत्यादी प्रकारच्या दुकान ओळींचा समावेश असतो. याच पारंपरिक ओळींनुसार यात्रेचे प्लॉट लेआऊट रेखांकन करून यात्रा आयोजित करण्यात येते.
जागा लिलाव तपशील
सन २०२५-२६ वर्षाकरिता यात्रेच्या परिसरातील प्लॉट/भुखंडाचा हर्रास व फेरहर्रास दिनांक ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत आयोजित केलेला आहे. यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून होणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages