Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना १ आणि २ डिसेंबर रोजी सुटी जाहीर

 





अमरावती, दि. २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यात आगामी नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे, मतदान अधिकारी/कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार असलेल्या सोमवार, दिनांक  1 डिसेंबर 2025 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.


Post a Comment

0 Comments