इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल



22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार परीक्षा

अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) च्या तारखेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षा पूर्वी दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केल्या होत्या. परंतु, याच दिवशी, 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झाले असल्याने, शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहेत. या बदलाची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages