चांदूरबाजार दि. (२७ ऑक्टोबर) ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क :-
ग्रामीण भागातील स्व. केशवदादा टोम्पे चांदूर बाजार फिजिकल अकॅडमी आणि श्री हनुमान क्रीडा मंडळ या अकॅडमी व मंडळ चा प्रतिभावान खेळाडू चि. अनुज कमल चौधरी याने जिद्द, परिश्रम आणि न थकणाऱ्या मेहनतीच्या जोरावर एशियन युथ गेम्स कबड्डी स्पर्धा, बहरेन (इराण) येथे भारताचा तिरंगा फडकावत सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या ऐतिहासिक यशामागे इंडिया सेक्रेटरी व विदर्भकबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनुजची भारतीय संघात निवड झाली.
अनुजच्या या यशात अम्युचर कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, स्व. केशवराव टोम्पे फिजिकल अकॅडमी, श्री हनुमान क्रीडा मंडळ, जगदंब कबड्डी क्लब, तसेच कबड्डी खेळाडू मित्रपरिवार यांचे या सुवर्ण कामगिरीबद्दल जितेंद्रसिंह ठाकूर, अशोकराव देशमुख, सतीषराव डफळे, भास्करराव टोम्पे (अध्यक्ष, गो. सी. टोम्पे कॉलेज, विजयराव टोम्पे (सचिव, गो. सी. टोम्पे कॉलेज, जीवनराव जवंजाळ अध्यक्ष, जीवन आधार सामाजिक संस्था, अतुल रघुवंशी, मनोज कटारिया, आनंद उर्फ टिकू अहिर अध्यक्ष, श्री हनुमान क्रीडा मंडळ, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवळे, पत्रकार सागर सवळे, क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले, क्रीडा मार्गदर्शक सनी चिखले आणि सर्व कबड्डीप्रेमींनी अनुजचे मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. चांदूर बाजारसारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणार्या अनुजने विदर्भासह महाराष्ट्राचाही मान उंचावला आहे.