रद्दी खरेदीसाठी २५ सप्टेंबरपर्यत निविदा पाठविण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

रद्दी खरेदीसाठी २५ सप्टेंबरपर्यत निविदा पाठविण्याचे आवाहन


 

अमरावती दि.20(ग्रामीण उदय प्रतिनिधी):  जिल्हा माहिती कार्यालयातील एक वर्ष कालावधीतील रद्दीची विक्री करावयाची असून खरेदीदारांकडून विहित नमुन्यात मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

इच्छूक रद्दी खरेदीधारकांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता विहित नमुन्यातील निविदा  दरपत्रकसह सादर करावे. जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती यांच्या नावे निविदा सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार, दि. 25 सप्टेंबर 2025 राहील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 4 वाजेपर्यत निविदा प्रत्यक्षात कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

 कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, खापर्डे बगीचा, डॉ. गणेश काळे यांच्या दवाखान्यासमोर, अमरावती असा आहे. निविदा मोहोरबंद पाकीटात देण्यात यावी. निविदा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता उघडण्यात येईल. या दिवशी संबधीत निविदाधारकांनी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित रहावे. तसेच निविदा धारकांनी निविदा पत्रावर स्वत:चा संपर्क (मोबाईल नं.) नमूद करावा. अंतिम तारखेनंतर प्राप्त निविदांचा विचार करण्यात येणार नाही. आणि निविदेचे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी यांना राहील, याची नोंद घ्यावी.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages