Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २  : ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुरक्षितता कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६  करीता १० लाख ८०  हजार माती नमुने प्रयोगशाळेत तपासणी करणे व २ लाख २२ हजार माती नमुने ग्रामस्तरीय माती नमुने तपासणी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याबाबत वार्षिक कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.

वार्षिक कृती आराखड्यामध्ये ४४४ नवीन ग्रामस्तरीय माती नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणी करण्याकरिता मंजुरी मिळालेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रयोगशाळा उभारण्यासाठी दिड लाख आर्थिक सहाय देण्यात येणार असून व्यक्ती, शेतकरी सहकारी संस्था, निविष्इा किरकोळ विक्रेते आणि शाळा, कॉलेज, युवक, युवती यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्ह्याकरिता १५  ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेचे लक्षांक दिले असून, इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून अंतिम निवड केली जाणार आहे. प्रयोगशाळेसाठी लाभार्थी युवक, युवती १८ ते ४०  वयोगटातील असावा. स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्ज करू शकतील. लाभार्थ्यांची शैक्षणिक अर्हता किमान दहावी इयत्ता विज्ञान व संगणक विषयाची माहितीसह उत्तीर्ण असावा. अर्जदारासोबत शैक्षणिक अर्हतेसोबत आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्जदार, गटाची स्वतःची इमारत किंवा किमान ४ वर्षांच्या भाडेकरार असलेली इमारत असणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments