वसतिगृह इमारत भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित


अमरावती, दि. २  : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत जिल्हास्तरावर मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी १५  दिवसांच्या आत प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सध्यास्थितीत शासकीय जमीन प्राप्त झालेली नसल्यामुळे खासगी इमारती भाड्याने घेऊन वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती शहरात मुलांसाठी शासकीय वसतिगृह स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार अंदाजे ९ हजार २०० चौरस फूट बांधकाम असलेली सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारत भाड्याने घेण्यात येणार आहे. इच्छुक इमारत मालकांना इमारती भाड्याने देण्याची इच्छा आहे, त्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे संपर्क साधावा किंवा adobbwoamravati@gmail.com या ईमेल यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक गजेंद्र मालोठाणे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments