ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 29, 2025

ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


             अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राज्य शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

               शहरी व ग्रामीण विभागातील चारही वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख रूपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

            सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० सप्टेंबर,२०२५ पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages