अमरावती, दिनांक : २९ जुलै २०२५ :पर्यटन क्षेत्रात उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पर्यटन व्हीलास, पर्यटन अपार्टमेंट, होमस्टे, व्हेकेशनल होम्स इ. नोंदणी करण्यात येणार आहे, स्थानिक व्यवसायिकांनी आर्थिक सक्षम करण्यासाठी पर्यटन व्हीलास, पर्यटन अपार्टमेंट, होमस्टे, व्हेकेशनल होम्स इ. करीता संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. इच्छुंक व्यवसायिकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन उपसंचालक विजय अवधाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यासाठी उपसंचालक पर्यटन कार्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्रे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटन विला, पर्यटन होमस्टे, व्होकेशनल होम्स, इ. च्या नोंदणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्ती ठरविण्यात आल्या. तसेच पर्यटन घटकांचे मालक ऑपरेटर यांच्या भुमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अमरावती विभागातील विविध पर्यटन घटकांना आवाहन करण्यात येते की नोंदणी करावी. याबाबतची अर्जप्रणाली www.maharashtratourism.gov.in या प्रणालीवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी करीता पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय अमरावती फोन नं. ०७२१-२९९०४५७ Email-ddtourism.ami-mh@gov.in यावर संपर्क साधावा, असेही पर्यटन विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.
******
Post a Comment
0 Comments