Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिरजगावात रस्त्याची दुर्दशा, घाणीचे साम्राज्य, रपटे उखडले ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष



दिनांक २९ डीगांबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या शिरजगाव कसबा ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याचे गावावर लक्ष नसल्यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे.व गावातअतिक्रमण वाढलेले आहे.
     जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत अंदाजे 30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १७ ग्रामपंचायत सदस्य असलेली कार्यकारणी आहे. गावाचा मुख्य रस्ता असलेल्या ग्रामपंचायत इमारत चे बाजूलाच आठवडी बाजारात रस्त्याची दुर्दशा झाली असून नाली वरचे  लोखंडी रपटे उखडलेले असल्यामुळे गावात वाहनधारकांना आपली वाहने नेता येत नाही. गावाचे चौका, चौकात  अतिक्रमण वाढलेले आहे.त्याबाबत ग्रामपंचायत ने कोणतीच कार्यवाही केली नाही.
   मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी ग्रामसेवक ऐवजी ग्राम विकास अधिकाऱ्यांचे पद आहे परंतु ग्रामविकास अधिकाऱ्यांचे गावावर लक्ष नाही. सरपंच आमचे ऐकत नाही असे ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे असल्यामुळे ग्रामपंचायत च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे गावातील तरुण वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गावातील तरुण वर्ग पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्याला घेराव घालणार असे बोलले जात आहे.
Tags

Post a Comment

0 Comments