जनसंवाद कार्यक्रमात ६० नागरिकांचे निवेदने प्राप्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

जनसंवाद कार्यक्रमात ६० नागरिकांचे निवेदने प्राप्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद



      
अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी दि, १७ जुलै ला  विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील समस्याबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. या कार्यक्रमात जिल्हाभरातून साठ निवेदने प्राप्त झाली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

 

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी घेतल्या. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते. जनसंवाद  कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री यांना प्राप्त झालेले निवेदन त्यांनी संबंधित विभागाकडे देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

 

वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा, आरोग्य, बांधकाम या विविध विषयांवरील निवेदने प्राप्त झाली. अनेक नागरिक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.  यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages