शिरजगाव कसबा दिनांक १५
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
भारतीय स्वातंत्र्याचा ८० स्वातंत्रदिन सोहळा शिरजगावातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे.
पत्रकार सहकारी पतसंस्था मुख्यालयात आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्षाचे निमित्ताने सौ. सुरेखा विलासराव दामेधर (माजी जि. प.सदस्य) यांनी ध्वजारोहण केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर सुने संस्थापक अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे राजेंद्र यावुल संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, अशोक याऊल,सौ. वैशाली कुऱ्हाडे, सौ.पुजा निचत संचालक मंडळ, ग्रा.प. सदस्य गजानन बेहरे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरजगावचे कर्मचारी हजर होते, यावेळी पतसंस्थेचे नंदकुमार पोकळे सीईओ व कर्मचारी वर्ग हजर होते.
श्री बालमुकुंद राठी विद्यालयात ठाणेदार अमन शिरसट यांनी ध्वजारोहण केले आहे. या विद्यालयात १४ ऑगस्टला विद्यार्थ्यांना गणवेश वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप राठी संचालक श्री बालमुकुंद राठी शिक्षण संस्था हे होते. तर प्रमुख पाहुणे मनोहर सुने माजी जि. प. सभापती अमरावती, प्रवीण खेरडे प्रशासक ग्रा.प. शिरजगाव, देवनाथ खारोने सामाजिक कार्यकर्ते, जयसिंग ठाकूर, जवाहर भुस्कटे, योगेश पोकळे, प्रदीप बेहेरे, चवलसिंग ऊईके, प्रवीण जवंजाळ ,रंजीत दाभाडे ,नरेंद्र डहाके, विनोद शेलुकार विद्यार्थी पालक, मुख्यध्यापक सतीश सुरडकर व पर्यवेक्षक ज्ञानेश्वर नवलकर हजर होते.
जनता सहकारी बँक शाखा शिरजगाव अध्यक्ष अविनाश बदुकले यांनी ध्वजारोहण केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक प्रवीण खेरडे यांनी ध्वजारोहण केले आहे. यावेळी सर्व ग्रामपंचायत प्रशासक सदस्य व ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते., तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र पारधी हजर होते.
श्रीमती गंगाबाई गणोस्कर विद्यालय, श्रीमती लक्ष्मीबाई भेले कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिष्ठित नागरिक स्वप्निल यावले यांनी ध्वजारोहण केले आहे.
पत्रकार सहकारी पतसंस्था शाखा देऊरवाडा मध्ये संचालक श्रीकृष्ण पोटे यांनी ध्वजारोहण केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण सिनकर पतसंस्था उपाध्यक्ष, शाखा व्यवस्थापक सुनील राऊत गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
0 Comments