Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू


 

          अमरावती, दि. २९  :महाराष्ट्र शासनच्या उच्चशिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वलगांव रोड, अमरावती येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात एकुण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे आहे. त्यापैकी ३५ जागा रिक्त आहेत.यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

          ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न २०२४-२५ मधील एकलाख रूपयांच्या आत राहील आणि या शहराचा रहिवासी नाही, त्याच पाल्यांना गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. प्रवेशीत विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये फक्त राहण्याची व जेवणाची मोफत सोय केल्या जाईल. अन्य कोणत्याही इतर सुविधा देण्यात येणार नाहीत. इच्छूक व गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज हे मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वलगांव रोड, नागपूरी गेट पोलिस स्टेशन चौक, अमरावती (गुगल मॅपवर गव्हर्मेंट इबीसी मुलांचे वसतीगृह सर्च करावे.) येथे २४ तास विनामुल्य प्रवेश अर्ज देणे सुरु आहे. प्रवेश अर्ज घेण्याकरीता विद्यालय/महाविद्यालयात प्रवेश झाल्याचा पूरावा सोबत आणावा. या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी गृहप्रमुख अनिल तसरे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५५१५८४ वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

 

Post a Comment

0 Comments