जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

 

        अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी  सैनिक वीर पत्नी यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी़ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथून अर्ज प्राप्त करुन १  सप्टेंबर २०२५  पर्यंत सर्व कागद पत्रासहित प्रस्ताव जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना, वीर पत्नी यांना कळविण्यात येत की, ज्या माजी सैनिक, वीर पत्नी यांच्या पाल्यांना इयत्ता दहावीमध्ये ९०  टक्के व बारावीमध्ये ८  टक्के व त्यापेक्षा जास्त गुण  प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला असल्यास तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages