सैनिकी मुला, मुलींचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

सैनिकी मुला, मुलींचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू


        अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): माजी सैनिक, वीर पत्नी यांना सूचित करण्यात येते की, अमरावतीमध्ये माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी जवाहर नवोदय विद्यालयाच्या मागे असून या वसतिगृहामध्ये एकुण ४८  मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतीगृह, नंदनवन कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे असून या वसतिगृहामध्ये एकुण ४८ मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६  या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक, वीर पत्नी अमरावती शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य अमरावती येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रॅन्कप्रमाणे भाडे आकारले जाते व वीर पत्नी यांच्या पाल्यांना या वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो.

प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधीक्षक तसेच वसतिगृहात उपलब्ध आहे. वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधीक्षक, अधीक्षका यांचेकडून प्रवेश पुस्तिका खरेदी करून अर्ज त्यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिक पाल्यास दरमहा २  हजार ५००  रूपये तर  सिव्हिल पाल्यास दरमहा ३  हजार ५००  रूपये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील नमुद दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती (0721-2530366), 8329968301, 8668964662 तर सैनिकी मुलींचे वसतिगृह, नंदनवन कॉलनी, अमरावती (0721-2550429), 8830865337 आणि  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती (0721-2661126) यावर संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages