Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची चरण सेवा व आरोग्यसेवा




        अमरावती, दि. २   (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची चरण सेवा आणि आरोग्यसेवा नुकतीच  श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रार्थना मंदिर , दस्तूर नगर , अमरावती येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ,अमरावती आणि श्री सत्यसाई सेवा संघटना, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  पार पडली.

          या उपक्रमात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार व आवश्यक औषधांची सेवा श्री सत्यसाई सेवा संघटना यांच्यामार्फत प्रदान करण्यात आली. सेवा दलातील स्वयंसेवकांनी समर्पणभावनेने वारकऱ्यांची सेवा केली.

          तसेच, या प्रसंगी उपस्थित सर्व वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या कार्यपद्धती, उपचारासाठी मिळणारी आर्थिक मदत व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले , अशी माहिती, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अमरावतीचे अध्यक्ष  डॉ. श्याम गावंडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments