Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अमरावती, दि.२८  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दि, २६ जून ला  जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

Post a Comment

0 Comments