अमरावती, दि. २८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या काळातील आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला त्या काळातील घटनांचा इतिहास आणि लोकशाहीच्या संरक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. आणीबाणीच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आणीबाणीशी संबंधित विविध घटना, घडामोडी, त्या काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या मान्यवरांची छायाचित्रे, तसेच संक्षिप्त माहितीपूर्ण मजकूर आणि माहिती फलकांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
Post a Comment
0 Comments