जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात पिंपरी -चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमातील अंतिम मुल्यमापन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेली सर्वोत्तम कामगिरी या विषयावर ही मुलाखत मंगळवार, ३  जून २०२५ रोजी रात्री ८.००  वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रशासनात सुलभतालोकाभिमुखतातंत्रज्ञानाचा प्रभावी वापरकर संकलनात वाढ आणि नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी या बाबींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी वापर करणे तसेच कर संकलन वाढीसाठी राबविलेल्या नवनवीन उपक्रम राबविणेऑनलाइन सुविधामालमत्ता जप्ती लिलावजिओ सिक्वेन्सिंग आणि यूपीआयसी आयडी अशा महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेने भर दिला आहे. या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याविषयी आयुक्त श्री. सिंह यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

खालील लिंकवरूनही ही मुलाखत पाहता येईल :

 

एक्स (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक: https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब: https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

Post a Comment

0 Comments