इंडिया स्किल्स स्पर्धेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, October 12, 2026

इंडिया स्किल्स स्पर्धेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ



*१९ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

 

अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ यांच्या वतीने 'इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवून आता दि.१९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

 

इंडिया कौशल्य स्पर्धा २०२६-२७ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सामान्य ५६ क्षेत्रे यात वैयक्तिक सहभागासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. विशेष क्षेत्रे ऑटोनोमस मोबाइल रोबोटिक्स, काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क, लँडस्केप गार्डेनिंग याकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००६ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मॅकॅट्रोनिक्स, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या लिंकवर नावनोंदणी प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages