गांधीजींचा आचार हाच गांधीवाद; सत्य, अहिंसा, सर्वोदय व सत्याग्रहाची जगाला देण
अमरावती, दि.५ : महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असून, गांधीवाद ही जगातील अभूतपूर्व व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे. शस्त्राशिवाय अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा उभा करणारे गांधीजी हे जागतिक इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. “त्यांचा आचार हाच गांधीवाद असून, गांधीवाद हा धार्मिक, आध्यात्मिक मानवतावाद आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी केले.महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर, अमरावती यांच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित गांधी जयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. तराळ म्हणाले की, गांधीवादाचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून त्याचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला आहे. जगातील अनेक मोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि कलावंत गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले. विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही गांधीजींच्या अहिंसा आणि नैतिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले होते. गांधीजींनी आत्मपरीक्षण व आत्मज्ञानाच्या माध्यमातून जीवनातील उच्च नैतिक मूल्यांचा शोध घेतला. त्यामुळे गांधी हे केवळ एका कालखंडापुरते मर्यादित व्यक्तिमत्त्व नसून कालातीत विचारांचे प्रतीक आहेत.
ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या मानवतावादी परंपरेच्या संदर्भात गांधीजींच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. जगात राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीची भावना व्यापक करण्यामध्ये गांधीजींचे योगदान महत्त्वाचे आहे. एकादशव्रत, असहकार, सर्वोदय आणि सत्याग्रह या गांधीजींच्या जगाला दिलेल्या महत्त्वपूर्ण देणग्या आहेत. मानवी समाजासमोरील विविध प्रश्नांकडे सत्य, अहिंसा, मानवता आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा गांधीवाद देतो, असेही त्यांनी सांगितले.
फुले, गांधी व शास्त्रींच्या विचारांचे स्मरण
यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, स्वावलंबन आणि सामाजिक सलोख्याच्या विचारांसोबतच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक समता व शिक्षणाच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले. व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा या सामाजिक प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून विवेकवादी व मानवतावादी समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांनी मांडले विचार
याप्रसंगी डॉ. दिलीप काळे, श्री पुरुषोत्तमराव गावंडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. मंदा नांदुरकर, ॲड. नीता कचवे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, प्रा. नेहा भटकर, प्राचार्य दादाराव दाभाडे, अनिल पांचाळे, प्रा. नरेंद्र राऊत, डॉ. श्रीधरराव जावरकर आदींनी आपले विचार मांडले.
गांधीविचारांना भजनातून उजाळा
श्री बाळासाहेब महल्ले, प्राचार्य रामकृष्ण धारपवार, गजेंद्र पाथरे, नीलिमा भोजने आणि सौ. छाया पाथरे यांनी गांधीजींच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. या सादरीकरणातून गांधीविचारांना भावपूर्ण उजाळा मिळाला.
कार्यक्रमास श्री अनंत हागणे, श्री शंकरराव वसू, संतोष देशमुख, नरेंद्र तायवाडे, नीलिमा भोजने, बबिता वानखडे, प्रतिभा खापरे, संजय खापरे, सचिन वासनिक, डॉ. राणी नागापुरे, गजेंद्र पाथरे, साहेबराव खंडारे, कोंडे काका,उल्हे काका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राणी नागापुरे यांचा सत्कार
डॉ. राणी नागापुरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मंदा नांदुरकर यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा फुले शताब्दी जन्मोत्सव समिती, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, मराठी जनसाहित्य परिषद, आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ, आदिसंपदा, बौद्धिलकी प्रतिष्ठान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सर्वोदय मंडळ अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन तसेच शहीद समाज सेवा समिती आदी समविचारी संस्था व संघटनांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रतिभा खापरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानद संस्थापक व सचिव श्री वसंतराव वंडलकर, कार्याध्यक्ष श्रीधरराव डहाके आणि कोषाध्यक्ष रामदासजी सदार तसेच श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.