डॉ. कल्पना काळे
अमरावती, दि.२६(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती (जीएमसी) येथे जनसंपर्क अधिकारी पदी डॉ. कल्पना काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. काळे या सध्या महाविद्यालयात जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे.