सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 24, 2026

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

 ‘

मुंबई, दि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत घोघारी मोहल्ला, मस्जिद स्ट्रीट येथील अब्दुल कादिर हाफिजका मनपा उर्दू शाळा तसेच कुंभारवाडा येथील गुलालवाडी मनपा हिंदी शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात आली.


जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दोन्ही शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्व जाणून घेत विद्यार्थ्यांनीही परिसर स्वच्छ राखण्याचा संदेश आत्मसात केला.

 

स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्वच्छ शाळा, सुंदर परिसर आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages