पत्रकारांच्या कायदेशीर संरक्षणासह पत्रकार–अधिकारी सलोख्याच्या संबंधांवर चर्चा
शिरजगाव कसबा दिनांक १९
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शिरजगाव कसबा येथून ५ किमी दूरवर असलेले थुगाव पिंपरी येथील श्री क्षेत्र अरुणेश्वर धाम, निंभोरा घाट येथे पत्रकारांचे एकदिवसीय चर्चा सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या चर्चासत्राला परिसरातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चर्चासत्रात पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांचे कायदेशीर संरक्षण, पत्रकारिता करताना येणाऱ्या विविध अडचणी, पत्रकारांचे अधिकार व कर्तव्ये तसेच पत्रकार आणि अधिकारी यांच्यातील सलोख्याचे व समन्वयाचे संबंध या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाबारावजी खडसे, ॲड.राजेश खडसे, पत्रकार धनंजय वांगे , तालुका अध्यक्ष डॉ. राहुल अहिर, जयसिंग ठाकूर,अमृत काशिकर, उपस्थित होते.
यावेळी विलास खाजाने,संदीप वानखडे, संदीप मानमोडे, कविता मानमोडे, प्रज्वल बहेकर, प्रताप गवई, दिनेश अमझरे, रुपेश फरकुंडे, भूषण राव,मुकेश भोयर, इमरान पठाण, चंदन धाकडे , अक्षय गुर्जर ,गायत्री मुकेश भोयर, कु.स्वरा , सौ. विद्या दाभाडे ,डींगाबर सुने,यांच्यासह अनेक पत्रकार व परिसरातील वृत्तपत्र विक्रेता उपस्थित होते.
चर्चासत्रादरम्यान पत्रकारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या मांडल्या आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य आहे, यावरही विचारविनिमय करण्यात आला. पत्रकारांनी कायदेशीर चौकटीत राहून तथ्याधारित पत्रकारिता करणे आणि प्रशासनानेही पत्रकारांच्या प्रश्नांकडे सकारात्मक संवादातून पाहणे, याबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकार व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. स्नेहभोजनाच्या माध्यमातून पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि मान्यवरांमध्ये आपुलकीचा संवाद साधला गेला आहे.
“पत्रकारिता ही सेवा” या भावनेतून समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.