व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 2, 2026

व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


 

अमरावती, दि.३ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*): इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिवार्य आहे.

 

                इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील 12 वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर  येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज  आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages