प्रगती दिनेश कल्पेकर ठरली "कौन बनेगा करोडपती" ची यशस्वी स्पर्धक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

प्रगती दिनेश कल्पेकर ठरली "कौन बनेगा करोडपती" ची यशस्वी स्पर्धक




अमरावती, दि. २९:
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयात  लिपिक-नि- टंकलेखक पदावर कार्यरत कु. प्रगती दिनेश कल्पेकर हीने सोनी टिव्हीवरील "कौन बनेगा करोडपती" या बहुचर्चित, सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमात विविध काठिण्यपातळ्या पार करीत प्रवेशित होऊन बिगबी श्री अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत तीन‌ फे-या पूर्ण करून 5 लाखांचे मोठे बक्षिस पटकावले आहे. वाचन, मनन आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा छंद जोपासलेल्या कु. प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रारंभी प्राथमिक प्रवेश फेरीत विविध कठीण चाचण्या व संगणकाद्वारे  Randomly निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये कु. प्रगती हीने मारलेली धडक अत्यंत कौतुकास्पद व लक्षवेधी ठरली. त्यानंतर केबीसीच्या चमूकडून संपर्क साधून तिला स्पर्धेसाठी बोलावले गेले. मागील आठवड्यात ही स्पर्धा खेळली गेली. प्रथम ‘फास्टेस्ट बझर फर्स्ट’या चाळणी पद्धतीमध्ये केवळ काही मिलीसेकंदांचा फरकही कोणाची निवड होणार हे ठरवू शकतो.

त्यामुळे अंतिम निकाल हा केवळ ज्ञानावर नव्हे, तर वेळेचे अचूक भान, क्षणातील प्रतिक्रिया आणि काही प्रमाणात नशिबावरही अवलंबून असतो. यातही ती अव्वल ठरली व बिगबीच्या समोरील "हॉटसीट"ची ती मानकरी ठरली. कु. प्रगतीच्या "कौन बनेगा करोडपती" या स्पर्धेच्या चित्रीकरणाचे एपिसोड गुरुवार 27 ऑगस्ट आणि शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर दोन भागात प्रसारित झाला. 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages