भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ला बुद्धिबळ वाटायचे कंटाळवाने, - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 22, 2026

भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ला बुद्धिबळ वाटायचे कंटाळवाने,

 

 आज आक्रमक खेळाचा चेहरा



दिव्या देशमुख ही मूळची नागपूर, महाराष्ट्र येथील असून तिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी झाला. तिचे शिक्षण १२ वी नंतर ओपन स्कूलिंगद्वारे झाले आहे. तिचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख आणि आई डॉ. नम्रता देशमुख दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. तिला आर्या देशमुख नावाची एक मोठी बहीण आहे.
बॅडमिंटनसाठी गेली, खेळू लागली बुद्धिबळ: दिव्याची मोठी बहीण आर्या ही बॅडमिंटन खेळायची. दिव्या तिच्यासोबत तिथे जायची, परंतु तिची उंची बॅडमिंटन नेटपर्यंत पोहोचत नव्हती. त्याच हॉलमध्ये बुद्धिबळ खेळले जायचे, तिथे दिव्याचे लक्ष गेले आणि ती बुद्धिबळ शिकली.
लेकीसाठी आईने सोडली प्रॅक्टिस: दिव्याचे वडीलही बुद्धिबळ खेळायचे. दिव्या अत्यंत आज्ञाधारक आणि मेहनती मुलगी असल्याने, तिच्यासाठी तिच्या आईने स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायावर (प्रॅक्टिस) बऱ्याच काळासाठी मर्यादा घातल्या.
आईचे आजोबा विनोबा भावेंच्या सहवासात: दिव्याचे आईचे आजोबा प्रसिद्ध भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत नियमितपणे बुद्धिबळ खेळायचे. त्यामुळे बुद्धिबळाचा वारसा तिच्या कुटुंबात आधीपासूनच होता.
देशाची केवळ चौथी महिला ग्रँडमास्टर: दिव्या ही भारताची केवळ चौथी महिला ग्रँडमास्टर आहे. तिने वयाच्या ९ व्या वर्षी २०१४ मध्ये डर्बन येथे वर्ल्ड युथ अंडर-१० स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ब्राझीलमधील अंडर-१२ स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले.
वुमन्स वर्ल्डकप: २०२१ मध्ये ती वुमन ग्रँडमास्टर बनली आणि २०२४ मध्ये तिने वुमन्स वर्ल्डकप जिंकला. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
तिने २०२० मध्ये फिडे ऑनलाइन चेस ऑलिम्पियाडमध्ये सांघिक सुवर्णपदक आणि २०२३ मध्ये आशियाई वुमेन्स चेस स्पर्धा जिंकली.
पुरस्कार आणि सन्मान
अर्जुन पुरस्कार: भारत सरकारने बुद्धिबळ क्षेत्रातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
३ कोटींचे रोख बक्षीस: महाराष्ट्र शासनाने (तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते) नागपूर येथील एका समारंभात दिव्याला ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित केले होते.
दिव्या स्वतःला नैसर्गिकरीत्या आक्रमक बुद्धिबळपटू मानते. तिच्यामध्ये हा आक्रमकपणा आई आणि वडिलांच्या संस्कारांमुळे आला आहे. तिला नृत्याचीही प्रचंड आवड आहे.
 बुद्धीबळाचा थकवा घालवण्यासाठी आणि मानसिक तणावाचा सामना करण्यासाठी ती संगीत ऐकते, भरपूर झोपते. तिला हिंदी, इंग्रजीशिवाय पंजाबी, मराठी आणि तमिळ गाणी ऐकायला आवडतात. तिला 'पाणीपुरी' खायला खूप आवडते.
ट्रोलिंगविरुद्ध उठवला आवाज
फेब्रुवारी २०२४ मध्ये नेदरलँड्समधील एका स्पर्धेनंतर दिव्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटले होते की, "प्रेक्षकांना माझ्या बुद्धिबळापेक्षा माझे कपडे, केस, उच्चार आणि इतर अनावश्यक गोष्टींमध्ये जास्त रस असतो. क्रीडा क्षेत्रात महिलांची कमी कदर केली जाते आणि त्यांच्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाते." तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती आणि महिला बुद्धिबळातील लैंगिक भेदभावावर एक मोठी चर्चा सुरू झाली होती.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages