विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकीचे कॅन्टीन विनापरवाना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 31, 2026

विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकीचे कॅन्टीन विनापरवाना




 

अमरावती, दि. 1 : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने शहरात कारवाई करीत आहे. अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनसह नामांकित हॉटेलवर एफडीएने कठोर कारवाई केली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे आणि आदिती देशमुख यांनी ३० जुलै रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनची तपासणी केली. दोन्ही नामांकित संस्थांचे कॅन्टीन कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एफडीएने दोन्ही कॅन्टीनचालकांना कॅन्टीन तत्काळ बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. तसेच, यासंदर्भात अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे.

नागपूर हायवे रोडवरील 'हॉटेल गौरी इन' येथे दि. २९ जुलै २०२६ रोजी कारवाईदरम्यान गंभीर गैरप्रकार आढळले. हॉटेलमध्ये मुदतबाह्य ब्रेडचा साठा आढळला, तसेच किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुदतबाह्य ब्रेडचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. तसेच हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) वि. वि. चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages