‘पीएम-किसान’चा 23 वा हप्ता 20 जूनला वितरित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 16, 2026

‘पीएम-किसान’चा 23 वा हप्ता 20 जूनला वितरित

 


 दिनांक: 16 जून 2026

 

राज्यातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1 हजार 817 कोटींचा लाभ

२३ व्या पी.एम. किसान हप्त्याचे २० जून रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वितरण;

देशभर साजरा होणार 'पी.एम. किसान उत्सव दिवस'

मुख्य समारंभाचे https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर थेट प्रक्षेपण

        अमरावती, दि. १७ :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेचा एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीतील २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार, २० जून रोजी वितरित केला जाणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून या हप्त्याचे थेट वितरण होणार असून, या विशेष प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने २० जून हा दिवस संपूर्ण देशभर 'पी.एम. किसान उत्सव दिवस' म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या २३ व्या हप्त्यांतर्गत महाराष्ट्रातील तब्बल ९०.८५ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना सुमारे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना २२ हप्त्यांमध्ये एकूण ४१,०८३ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण रफिक नाईकवाडी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

            केंद्र शासनाच्या निकषांनुसार, पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केल्या आहेत. यासोबतच लाभार्थ्याकडे 'फार्मर आय.डी.' असणे देखील केंद्र शासनाने क्रमप्राप्त केले आहे. या उत्सव दिवसाचे औचित्य साधून राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तर, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs/FPOs) आणि सहकारी पतसंस्था (PACS) या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक सुविधा केंद्रांवरूनही (CSC) शेतकऱ्यांना या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.

            राज्यामध्ये कृषी विभाग, महसूल व वने विभाग, तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा सर्वदूर साजरा केला जाणार आहे. या मुख्य समारंभाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर होणार असून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधू-भगिनींनी या लिंकचा वापर करून समारोहात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

         

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages