महागाईचा 'धोंडा'! सोन्या-चांदीचे भाव गगनाला, जावईबापूंना कोणते दान? सासरच्या मंडळींसमोर पेच - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, May 24, 2026

महागाईचा 'धोंडा'! सोन्या-चांदीचे भाव गगनाला, जावईबापूंना कोणते दान? सासरच्या मंडळींसमोर पेच

  • दि. २५
  • पुरुषोत्तम मास की महागाईचा मास? अधिकमासाच्या परंपरेला वाढत्या किमतींचे ग्रहण!
  • सोनं १.५ लाख पार, चांदी अडीच लाखांवर!
  •  हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिकमासाला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्याच्या गगनचुंबी महागाईमुळे आणि सोन्या-चांदीच्या कडाडलेल्या दरांमुळे सासरच्या मंडळींसमोर जावयाचा मान-पान कसा करावा, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. 
  •  सोन्या-चांदीच्या दरांनी ओलांडली सीमा
  •  बाजारपेठेत सध्या सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ५७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
  • सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची गरज ओळखून सराफा व्यापाऱ्यांनी ५०० मिलिग्राम ते १ ग्रॅम वजनाचे हलके दागिने आणि चांदीचे लहान 'धोंडे' बाजारात आणले आहेत. जेणेकरून परंपराही जपली जाईल आणि खिशालाही जास्त कात्री लागणार नाही.
  • केवळ सोने-चांदीच नव्हे, तर घरगुती गॅस सिलिंडर आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
  •  साखर, तूप आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये धोंड्याच्या महिन्यासाठी खास बनवल्या जाणाऱ्या 'अनारशांचे' दरही कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे जावयाला अनारशांची मेजवानी देणेही सासरच्या मंडळींसाठी खर्चिक बनले आहे.
  • जावईबापूंना विष्णूचे रूप मानून पूजण्याची परंपरा: या महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केले जाते. चांदीच्या किंवा सोन्याच्या ताटात गुळाचे ३३ अनारसे ठेवून ते जावयाला दान देण्याची आणि ऐपतीप्रमाणे नवीन कपडे किंवा दागिने देण्याची परंपरा आजही ग्रामीण आणि शहरी भागात आवर्जून जपली जाते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages