स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 18, 2026

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान

 



*जिल्ह्यात आचारसंहिता लागू

अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करणे, १ जून रोजी नामांकने (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची अंतिम तारीख, २ जून रोजी नामांकनांची छाननी, ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान, २२ जून रोजी मतमोजणी, २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages