नियोजनचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 12, 2026

नियोजनचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी आशिष येरेकर





 

अमरावती, दि. १३ : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनला 605 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्यास्थितीमध्ये प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येतील. त्यामुळे यंत्रणांनी जिल्हा नियोजनचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

महसूल भवनातील बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुरुवातीला जिल्हा नियोजनच्या बैठकीमधील उपस्थित मुद्यांबाबत अनुपालन अहवालाबाबत माहिती घेतली. त्यानंतर यावर्षी मंजूर निधीपैकी 60 टक्के निधी प्राप्त झाला असल्याने प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने याबाबत कार्यवाही सुरू करावी. येत्या जूनमध्ये प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यता घेताना कामाच्या याद्यांबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. त्यानंतर प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा नियोजनच्या कामांना एमएच-यूडीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी.

 

प्रशासकीय मान्यता दिलेला निधी याच वर्षी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी. शासनाने व्हीपीडीए यंत्रणा दिलेली असली तरी यात असलेला निधी वर्षभरातच वापरावा लागणार आहे. त्यानंतर यातील निधी आपोआप व्यपगत होत असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा नियोजनमधून केलेल्या कामांना कार्यालय प्रमुखांनी भेटी द्याव्यात. यात कामाचा दर्जा तपासण्यात यावा. जिल्हा परिषद आणि अन्य यंत्रणांना निधी दोन वर्षे खर्च करण्याची परवानगी आहे. त्यामुळे गेल्यावर्षीची कामे तातडीने पूर्ण होतील, याची काळजी घ्यावी. तसेच सेवा हक्क अधिनियमात अधिसूचित सेवा विहित कालमर्यादेत देण्यात यावा. याबाबत कार्यालयाला प्राप्त अर्ज निकाली काढावेत. याबाबत नियमित आढावा घेण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages