पांढऱ्या कोट्यातील देवदूत...
नर्सिंग एक पेशा नहीं, बल्कि एक जिम्मेदारी है जो मानव जीवन का बेहतर ढंग से ध्यान रखती हैं।
जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. करोना संकटकाळात परिचारिका करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम. जाणून घेऊया जागतिक परिचारारिका दिनाविषयीची माहिती...
रूग्णाची सेवा कोण करतं असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरआधी नाव येईल ते परिचारिकेचं. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारीका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुख-दुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. स्वताच्या आयुष्यातील काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्याचा ध्यास सुरु झाला तो दि. १२ मे १८२० रोजी उच्चकुलीन व श्रीमंत इंग्रज (ब्रिटीश) घराण्यात जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या मुळे. १८ व्या शतकात परिचारिका क्षेत्राला विशेष न मानले जाणाऱ्या काळातही फ्लॉरेन्स नाईटिंगेल कि ज्या अतिशय राज घराण्यातील असूनही त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे रुग्णसेवेसाठी समर्पित करणार आहे असे जाहीर केले. घरातून प्रचंड विरोध झाला. कठोर विरोध झुगारूनही १८४४ साली त्यांनी रुग्णसेवेचा व समाजसेवेचा स्वतंत्र निर्णय घेतला. याच काळात त्यांचे नर्सिग विषयाचे अधिकृत शिक्षणही पूर्ण केलेले होते. आयुष्यात प्रतिष्टेच्या दृष्टीने अतिशय अडचणी असताना, परिस्थितीला संधी मानून संधीचे त्यांनी सोनं केले. सन १८५४ रोजी झालेल्या क्रिमियन युद्धाच्या काळात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी ३८ परिचारिका बरोबर घरून त्यांचे कर्तुत्व सिद्ध केले. प्रशिक्षित परीचारीकांच्च्या मदतीने त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार करत मृत्त्यू दर झपाट्याने कमी केला. ह्या काळात त्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्या रात्री हातात कंदील घेऊन नाईट राउंड घेत असे, म्हणून त्यांना लेडी विथ ल्याम्प असेही संबोधतात. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झालं. असेच खूप सारे संशोधन, लेखन व समाजसेवा करत १३ ऑगस्ट १९१० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी पृथ्वीवरील एक अनमोल-अमृततुल्य काम संपवून त्या अनंतात विलीन झाल्या. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना श्रद्धांजली म्हणूनच १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
फ्लोरेन्स नायटिंगल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.
वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही हे निश्चित ...!
कंचन मुरके अमरावती
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र
(महिला मंच)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ