अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार 'डिजिटल मार्केटिंग', 'ई-कॉमर्स'ची साथ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार 'डिजिटल मार्केटिंग', 'ई-कॉमर्स'ची साथ

 




अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य देण्यासोबतच लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम व मार्केटींग टॅब या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ मिळावी, यासाठी महामंडळातर्फे मार्केटींग टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. लघू उद्योजकांकडील दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन हा मार्केटींग टॅब विकसित केला आहे. सदर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स फ्लीपकार्ट, ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे.

यात व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका याप्रमाणे सर्च सुविधा देण्यात आली आहे. भविष्यातील लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे बाबतही महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळाने वेबीनार, यूट्यूब, पॉडकॉस्टच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यात व्यवसाय कसा सुरू करावा, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक हाताळणी आणि आर्थिक नियोजनाची माहिती तज्ञ व्यक्तींकडून देण्यात येते. प्रशिक्षणाचे व्हिडिओ अधिकृत यूट्यूब आणि फेसबुल चॅनेलवर उपलब्ध आहेत,

महामंडळाने डीजी लॉकर सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली आहे. भविष्यात महा-आयडी व आधार कार्डबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages