आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत सूचना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 23, 2026

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत सूचना


                         


                                                                                                                              दिनांक: २४  एप्रिल २०२६


·       इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

·        30 मे अंतीम मूदत

          अमरावती दि. २४ : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये (सन 2026-27) प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पालकांना 27 एप्रिल 2026 पासून प्रकल्प कार्यालय धारणी तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये विनामूल्य अर्ज उपलब्ध होणार आहेत. प्रकल्प कार्यालयाद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड करून वरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीनंतर निश्चित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आह, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

          

           या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असावे. विद्यार्थ्याचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी दारिद्र्यरेषेखालील, आदिम जमातीतील तसेच विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार पालकांच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

          

         प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मे 2026 असून, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे पात्र पालकांनी सर्व अटी व शर्ती पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. शुक्ला यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages