पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्यात 32 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, March 11, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्यात 32 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड




अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यास जिल्ह्यातील महिला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रोजगार मेळाव्याला एकूण 50 रिक्त पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन 96 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 56 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 32 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये ओरस एच. आर. सोलुशन नांदगाव पेठ, रेडीयंत हॉस्पिट च्या वैशाली लाहे, एस बी.आय क्रेडीट कार्डचे राहुल सवाई या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली. तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राथामिक निवड केली.

 


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages