साप्ताहिक ‘विदर्भ प्रकाश’तर्फे चांदुर बाजार येथे सामाजिक उपक्रम
चांदुर बाजार, दि. ११ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ( डॉ. राहुल अहिर)
जागतिक महिला दिनानिमित्त साप्ताहिक विदर्भ प्रकाशतर्फे सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुला-मुलींना कपडे व विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्याचा उपक्रम चांदुर बाजार येथील गो.सी. टोम्पे महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात २०० दिव्यांग विद्यार्थ्यांना कपडे तर २०० विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गो.सी. टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्कर दादा टोम्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखाताई ठाकरे, अचलपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रूपालीताई माथने तसेच अखिल भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर दादा सुने उपस्थित होते.
यावेळी सुरेखाताई ठाकरे व मनोहर दादा सुने यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी समाजातील विविध क्षेत्रात पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षा रूपालीताई माथने यांनीही महिलांना मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले व विदर्भ प्रकाशचे संपादक संदीप वानखडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
संपादक संदीप वानखडे हे साध्या कुटुंबातून पुढे आले असून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून वंचित, पीडित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. “समाजासाठी काम करण्यासाठी पैसा नव्हे तर मोठे विचार आवश्यक असतात,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद शाळेच्या शिक्षिका रावडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सिटीलँड सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश हरवानी व जगदंब पब्लिक स्कूलचे अध्यक्ष विनोद कोरडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास पत्रकार गौतम खंडारे, सुयोग गोरले, करण खंडारे, तिलक सूर्यवंशी, प्रताप गवई, अतुल खंडारे, साक्षी वानखडे, संजय मोहोळ, जयकुमार बुटे, धीरज वंजारी, सचिन वानखडे, संजय देशमुख, कैलास गजबे, गौरव किटुकले, सुनील वानखडे तसेच माधुरी चव्हाण, पालीवाल मॅडम, नेहा अग्रवाल, प्रभावती रावडे, प्रगती गवई, ललिता वानखडे, ऋचा खंडारे आदींसह DGBIPL कंपनीचे नितीन अवसरमोल आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments