मेरा युवा भारततर्फे माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, February 7, 2026

मेरा युवा भारततर्फे माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन



अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
: मेरा युवा भारत कार्यालयातर्फे युवकांमध्ये केंद्रीय बजेटबद्दल जागरुकता आणि समज विकसित करण्यासाठी माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम क्विझ स्पर्धा नोंदणी मोहिमेचा भाग म्हणून बहुस्तरीय आणि सहभागी स्वरुपात आयोजित केला आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयस्तरावरील ऑनलाईन क्विझचा समावेश राहणार आहे. ही स्पर्धा दि. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी युवकांनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश स्तरावर निबंध लेखनासाठी निवड केली जाणार आहे. यात युवक केंद्रीय अर्थसंकल्प 2026 च्या प्रमुख विषयांवर विचार मांडतील. अंतिम टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवडलेल्या तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वर धोरणकर्ते आणि मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages