अमरावती महानगरपालिका रणसंग्राम: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 24, 2025

अमरावती महानगरपालिका रणसंग्राम:


 आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ; इच्छुकांची पहिल्याच दिवशी मोठी गर्दी

अमरावती २४ डिसेंबर २०२५:
अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, आज पहिल्याच दिवशी विविध प्रभागांतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज नेण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती.
प्रभाग आणि जागा: अमरावती महानगरपालिकेच्या एकूण २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे 
महानगरपालिका प्रशासनाने पाच विविध केंद्रांवर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक केंद्रांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच, अनेक इच्छुक उमेदवारांनी अपक्ष किंवा पक्षाच्या अधिकृत ए-बी फॉर्मच्या प्रतीक्षेत अर्ज भरण्याची तयारी दर्शवली आहे 
निवडणुकीचे समीकरण:
यंदाची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक मातब्बर नेत्यांचे प्रभाग बदलले असून, नव्या दमाच्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील सात दिवस ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, त्यानंतर अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. अमरावतीच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages