३५ वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

३५ वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग!




चंद्रभानजी विद्यालय कुंड सर्जापूरच्या १९८९ बॅचचे स्नेहसंमेलन

 

     दि.२८ सर्जापूर: जीवनातील सर्वात सुंदर टप्पा म्हणजे शालेय जीवन. याच सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी चंद्रभानजी विद्यालय कुंड सर्जापूर येथील १९८९ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र आले होते. या भावनिक 'गेट-टुगेदर' (Gate-Together) कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी खाना खजाना हॉटेल येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले होते .

      या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे, या माजी विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आदरणीय गुरुजनांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आर.जी किटुकले, आर. एस गावंडे, एम. एस शेकोकार, टी. के पटेल,एस.एम निर्मळ आदी उपस्थित होते.

     या शिक्षकांच्या उपस्थितीत, विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आणि आपल्या लाडक्या शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी सौ. सुचिताताई खुळे यांनी पार पाडली तर या अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी छायाचित्रण रोहन गौरकर यांनी केले.

      या निमित्ताने जुन्या मित्रांना भेटण्याची, बालपणीच्या खोड्या आठवण्याची आणि जीवनातील प्रवासाची देवाणघेवाण करण्याची एक सुवर्णसंधी मिळाली. १९८९ च्या या बॅचच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ३५ वर्षांनंतरच्या या भेटीची रंगत वाढवली आहे.

यावेळी दिवाकर गौरकर, शरद तायडे, शरद इंगोळे, प्रमोद माहूलकर, वासुदेव पारीसे, गजानन घाटे, विजय शिरसाठ, मारोती तायडे, सैय्यद जाकीर, एकनाथ ठवरी, सुरेश सैरीसे, नरहर पुनसे, राजू तायलकर, सुरेंद्र ढोणे, सुरेश महल्ले, राजेश उमेकर, अरविंद मानकर, राजेंद्र सैरीसे, राजू बडगे, गजानन कदम, विठ्ठल ओलिवकर, शेख रशिद, शंकर उमेकर, मोहन मानोटे, हिरालाल शेंडे, नरेश पापळकर, अर्जुन वासनीक, निवृत्ती मुंडे, गजानन मोहाड, नीता माहुरे, अनिता बंड, संगीता मानकर, पद्मा उमेकर, वर्षा मानकर, नर्मदा रंगारी, ममता काळे, मंगला माहूलकर, वैशाली विघे, कल्पना माहूलकर, जयश्री इंगोले, शीला दोनसंदे, सरला खोरगडे आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages