संविधान बांधिलकी महोत्सवा अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात संविधान जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, November 30, 2025

संविधान बांधिलकी महोत्सवा अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात संविधान जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न





अमरावती, दि. १ डिसेंबर २०२५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): संविधान बांधिलकी महोत्सवा अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे संविधान जागर कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, संविधान जागर अभियान, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन तसेच विविध समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका सामूहिकरीत्या उच्चारित केली आणि घटना तत्त्वांप्रती आपली निष्ठा व बांधिलकी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नरेंद्र धर्माळे (महा. अनिस. अमरावती) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निश्चय साक्षात साधना (संविधान जागर अभियान) यांनी संविधान विचार, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची भूमिका यावर सुलभ व परिणामकारक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये पवन गावंडे (शिक्षक), प्रफुल्ल कुकडे (कार्याध्यक्ष महा. अनिस. अमरावती), मो. अफसर भाई (संविधान जागर अभियान, अमरावती) आदी मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कुकडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमार्फत उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले व संविधानातील मूलभूत मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले.

निश्चय साक्षात साधना यांनी आपल्या भाषणात संविधान बांधिलकी महोत्सवाचे उद्दिष्ट, मूल्ये आणि सामाजिक जनजागृतीतील त्याचा प्रभाव स्पष्ट केला.

अध्यक्षीय भाषणात नरेंद्र धर्माळे म्हणाले:
“भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे जिवंत दर्शन आहे. संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
त्यांनी घराघरात संविधान अभ्यासाची व जागरूकतेची गरज स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्नील गवई, पवन गावंडे, श्री. उमाळे, श्री. वानखडे तसेच शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व विविध सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे संयोजन व संचालन स्वप्नील गवई यांनी केले तर पवन गावंडे यांनी आभार प्रदर्शन  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages