६ नोव्हेंबर जन्मदिन विशेष लेख
कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता_प्रवीण भाऊ पोटे
माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अमरावती
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रविणभाऊ पोटे यांच्या रूपाने असा नेता या जिल्ह्याला मिळाला की त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला, कार्यकर्त्याला थाप (खोटं) मारून परत करण्याचे काम त्यांनी कधीही केले नाही .अथवा त्यांच्या स्वभावाला ते जमले नाही. २०१२ पासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रविणभाऊंची कारकीर्द सुरू झाली. तत्पूर्वी त्यांचा वावर हा समाजसेवेचा राहीला. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांवर असीम भक्ती असलेल्या प्रविणभाऊंनी अमरावती शहरात अनेक ठिकाणी मंदिराचे निर्माण असो वा सहकार्य असो त्यांनी वेळोवेळी केले. समाजसेवेचा वसा प्रविणभाऊंनी त्यांचे वडील स्व. रामचंद्रजी यांचेकडून जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापूर, कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. कोरोना काळात तर त्यांनी कोविड हॉस्पीटलमध्ये स्वखर्चाने ऑक्सीजन सिलेंडर, एअर कंडीशनर उपलब्ध करून दिले. नुकतेच त्यांनी ॲनीमल होम याकरिता सुध्दा आर्थिक सहकार्य केले आहे.सन २०१२ मध्ये प्रविणभाऊ आमदार झाल्यापासून मला त्यांचेसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रविणभाऊ सोबत काम करीत असतांना जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडतांना मी जवळून बघितल्या आहे.सन २०१४ साली महाराष्ट्र शासनामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिली. सरकारमध्ये उद्योग, खणिकर्म, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांचा प्रभावी कार्यकाळ राहीला. प्रविणभाऊंसोबत काम करीत असतांना मी बघितले की, ते सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम करतात. आज ते पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सोबतच प्रविणभाऊ धर्मादाय संस्था चालवित असून अनेक गरजूंना सहकार्य करतांना मी जवळून बघितले आहे .अशा कर्मयोगी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज ६ नोव्हेंबर वाढदिवस...
केवळ अमरावती जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात सन २०१२ पासून आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ नेते प्रविण पोटे पाटील हे जिल्ह्यातील आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. मला माहित असल्यानुसार कमी वयापासून प्रविणभाऊ व्यवसाय आणि समाजकारणात आहे. पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेचा कार्यभार पाहताना त्यांनी या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपन्यांचा दौरा करून आणला आणि अमरावती शिक्षण क्षेत्रातील एकमेव संस्था म्हणून अमरावती इतिहासात नांव नोंदविले आहे .गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. शैक्षणिक संस्थेचा डोलारा सांभाळतानाच त्यांनी पालकमंत्री असतांना पालकमंत्री पांधण योजना कार्यान्वित करून ग्रामीण भागातील मुख्य प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले. १९/७/२०२३ साली भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांत त्यांनी नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे.
२०२५ मध्ये मराठवाडामध्ये महापुराचा फटका शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात बसला. या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्त कुटुंबाला राहण्याची, भोजनाची सोय, औषधोपचाराच्या सुविधा, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धतेकरिता त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २५ लक्ष रूपयाचे योगदान दिले आहे .सूर्योदयापासून रात्रीपर्यंत ते पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रविणभाऊंनी ५ ट्रक सहायता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाठविली आहे. संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ प्रविणभाऊंनी महाराष्ट्राला घालून दिला आहे.
१ वर्षापूर्वी त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला. असे असतांनाही त्यांचे समाजकार्य आजही ते करीत आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आजही नागरिक, कार्यकर्ता भेटायला येतो. तक्रारी, समस्या त्यांच्या पुढ्यात नियमितपणे मांडल्या जातात. त्या समस्या सोडविण्यांस ते पुर्ण मदत, सहकार्य करतात. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते.
शहरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, स्वच्छता, आरोग्याच्या प्रश्नासोबतच जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी भर देण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम प्रविणभाऊ पोटे पाटील आजही करीत आहेत. त्यामुळे शहरातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहे. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. प्रविणभाऊ पोटे यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि जिल्ह्याचे नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा...
🌹🌹🌹🌹
🙏
मनोहर सुने
माजी जि. प. सभापती अमरावती
तथा जिल्हा मंत्री
भारतीय जनता पार्टी मेळघाट अमरावती.
Post a Comment
0 Comments