माणूससुद्धा दिवाळीच्या
फराळासारखा असतो
काही माणसं
चिवडयासारखं
सगळीकडे
बेमालूमपणे मिसळणारी
असतात.
🌹
काहीं चकलीसारखी
स्वतःमध्येचं गुरफटलेली
असतात,
आत्ममग्न झालेली.
काहीं लाडूसारखी खुशालचेंडू असतात,
जिथें जातील तिथें गोडवा
निर्माण करतील.
काहीं शेवेसारखी,
स्वतःची गुंतागुंत
करून,कुठून
बोलायला सुरुवात
करावी हे न कळणारी
असल्यागत.
काहीं करंजीसारखी
वरवरुन चव कळतं
नसेल,
पणं एकदा कां त्यांच्या
अंतरंगात पोहचलं कीं
सारणासह तोंड,गोड
करुन सोडणारी.
अशी सर्व माणसं
एकत्र आली की,
जे तयार होते,त्याला मनुष्य स्वभावाचा
फराळ म्हणतात.
तो ज्याला खायला
जमतो,
त्याने आयुष्याची
दिवाळी साजरी केली असं म्हणतात.
🌹 दिनेश गोपाळ गोसावी 🌹
Post a Comment
0 Comments