ब्राह्मणवाडा थडी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मारहाण प्रकरणात राजकीय दबावाचा आरोप



 शिरसगाव कसबा दिनांक २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     ब्राह्मणवाडा थडी तालुका चांदूरबाजार ग्रामपंचायत महिला सरपंच पद्मा मेहकर व ग्रामपंचायत सदस्य राजु उल्हे यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच एकमेकांना मारहाण करण्याचा प्रकार ३१ जुलै रोजी घडलेला आहे.

        प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलाचे पती हस्तशस्त करतात अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य राजू उल्हे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कडे केलेली होती. त्यानंतर ग्रामपंचायत ठराव न घेता व  सरपंचाना न विचारता ग्रामसेवकांने विरोधी सदस्यांचे  ऐकून ग्रामपंचायत रेकॉर्डला ८ अ फेरफार केलेला असल्यामुळे याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात शाब्दिक चकमक होऊन वादाचे स्वरूप मारहाणीत झाले असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे.

     ‌ सदर प्रकरणाबाबत दोन्ही पार्टी ने पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या असून कालपासून जबाब नोंदला जात आहे. अद्याप पर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी, प्रहार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे जिल्ह्यावरून ठाणेदारावर दबाब येत असून त्यांच्यावर कारवाई करा व यांच्यावर कारवाई करू नका असे फोन येत असल्याचे गावामध्ये चर्चा आहे.

     या प्रकरणात पोलिसांनी नी:पक्ष पणे चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी गावातून होत आहे.


Post a Comment

0 Comments