जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक पदाची परीक्षेसाठी पात्र अपात्र यादी प्रसिद्ध - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 25, 2025

जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक पदाची परीक्षेसाठी पात्र अपात्र यादी प्रसिद्ध

 

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी मधील समुपदेशक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या मधील पात्र व अपात्र उमेदवार यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती वेबसाईट, जिल्हा परिषद अमरावती वेबसाईट तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या वेबसाईट वर तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर यादी उमेदवार यांनी तपासून पात्र उमेदवार यांनी आपलं ई-मेल पत्ता तपासून घेणे तसेच अजून काही ई-मेल असल्यास ते लेखी समाविष्ट करणे गरजेचे आहे.

अपात्र उमेदवार यांनी आपले अर्ज का अपात्र करण्यात आले त्याचे कारण त्या ठिकाणी नमूद असून काही आपक्षेप असल्यास लेखी स्वरूपात दि. २८ जुलै पर्यंत देणे बंधनकारक आहे. ई-मेल किंवा इतर माध्यमातून आपक्षेप चालणार नाही. मुदती नंतर आलेलं आपक्षेप ग्राह्य धरल्या जाणार नाही. यादी सोबतच दिल्या गेलेल्या सूचना वाचून घेण्याची जबाबदारी ही उमेदवार यांची राहील. इतर पुढील संपर्क हे फक्त ई-मेल द्वारे होतील तेव्हा दिलेला ई-मेल पत्ता वरील पत्रव्यवहार हा पाहण्याची जबादारी उमेदवार यांची राहील.

पदस्थापनेत बदल किंवा इतर बदल करण्याचे अधिकार हे राज्यस्तरीय येणाऱ्या सूचना मान्य करून निवड समितीस राहतील याची नोंद घ्यावी.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages