निवृत्तीवेतन नियमित चालू राहिल *कोषागार कार्यालयाचे स्पष्टीकरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 7, 2025

निवृत्तीवेतन नियमित चालू राहिल *कोषागार कार्यालयाचे स्पष्टीकरण



अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : निवृत्ती वेतन फॉर्म सादर केला नसल्यास निवृत्तीवेतन बंद होणार आहे, अशी अफवा समाजमाध्यमातून पसरविण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नसून निवृत्तीवेतन नियमित सुरू राहणार आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा कोषागार कार्यालयाने दिले आहे.

व्हॉट्स ॲप आणि इतर प्रसार माध्यमातून निवृत्ती वेतन फॉर्म सादर केला नसल्यास माहे जुलैपासून निवृत्ती वेतन बंद होणार आहे, असे संदेश व्हॉट्स ॲप व इतर समाज माध्यमावर प्रसारीत होत आहेत. कोषागारामधून निवृत्ती वेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. निवृत्ती वेतन बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सुचना कोषागारास प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना नियमित निवृत्ती वेतन चालू राहील. यासाठी कोषागार कार्यालयास भेट देण्याची गरज नाही. याची नोंद राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धाराकांनी घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages