अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत (पंधरवाडा) राज्यभरात विविध उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 24, 2025

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत (पंधरवाडा) राज्यभरात विविध उपक्रम

 


  शिरसगाव कसबा दिनांक २५ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार  संघाने संघटनेचे केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाच्या निमित्याने  राज्यभरात १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत(पधंरवाडा) विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

   याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेने १ ला टप्पा मध्ये केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा.रवींद्र मेंढे  व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , बाबाराव खडसे केंद्रीय कार्यालय प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त  राज्यभरात वृक्षारोपण   व विविध उपक्रम राबविलेले आहे. 

    पत्रकारांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवीत असताना सामाजिक उपक्रम राबवावे असे पत्रकार संघाने धोरण ठरविल्यामुळे महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी जिल्हा बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, व जिल्हा, तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, पत्रकार मेळावा, शालेय साहित्य वाटप आपल्या जिल्हा, तालुका स्तरावर करावे असे ठरविण्यात आलेले आहे.

३ ऑगस्टला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  मनोहर सुने यांचा वाढदिवस असल्यामुळे  या दिवशी  पत्रकार सहकारी पतसंस्था शिरजगाव कसबा मध्ये दुपारी २ वाजता पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात  उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा"कार्य गौरव" सत्कार  करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय कार्यकारिणी हजर राहणार आहे.  १५ ऑगस्टला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण यांचा वाढदिवस असल्यामुळे पंधरवडा उपक्रमाचा समारोप यानंतर होणार आहे.त्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे.

व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे

 सुरेश सवळे(केंद्रीय महासचिव)

 अशोक पवार(केंद्रीय सचिव )

राजेंद्र भुरे(केंद्रीय उपाध्यक्ष )

 प्रदिप जोशी (केंद्रीय उपाध्यक्ष )

बाबाराव खडसे (केंद्रीय कार्यालय प्रमुख)

राजेंद्र ठाकरे  (महाराष्ट्र प्रदेश  सरचिटणीस) 

यांनी प्रसिद्धीस काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages